जालना:लहान बालकांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
पिसीव्ही (न्युमोनोकॉकल कॉज्युगेट) लसीकरणास जिल्ह्यात 12 जुलै पासून प्रारंभ
जालना दि.9- भारतात दरवर्षी न्युमोनोकॉकल कॉज्युगेट या जिवाणुमुळे होणाऱ्या न्युमोनिया या आजारापासून 15.9 टक्के बालमुत्यु होतात. या आजारापासून संरक्षण मिळणाऱ्या हेतुने महाराष्ट्रात सार्वत्रिक लसीकरण कायर्कमांतर्गत दि.12 जुलै 2021 पासून पिसीव्ही ( नयुमोनोकॉकल कॉच्युगेट व्हॅक्सीन) या नवीन लसीकरण सुरुवात होत असुन एका वर्षाखालील बालकांना दीड महिला पहिला डोस, साडेतीन महिने दुसरा डोस तर नऊ महिने पुर्ण होताच तीसरा डोस देण्यात येणार असुन जिल्ह्यातील पालकांनी आपल्या पाल्यांना डोस देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले
लसीकरण कार्यक्रमाची पुर्वतयारी म्हणून जालना जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकरी यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पुर्ण झाले असून तालुका स्तरावर सर्व आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्व आशा कार्यकर्ती यांचे प्रशिक्षण 11 जुलै 2021 पूर्वी पुर्ण करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यासाठी लसीचे 2 हजार 500 डोसेस प्राप्त झाले असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुगणालय व प्रा.आ.केंद्र तसेच शहरी प्रा. अ. केंद्र लस वाटप करण्यात आली आहे.
या सर्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या बालकांस दीड महिन्यापासून सुरु करण्यात येणाऱ्या पहिल्या डोसपासुन वेळापत्रकानुसार लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे