मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी फोटो जमा करण्याचे आवाहन
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी त्यांची छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावीत सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे आवाहन
जालना, दि. 9 :-भारत निवडणूक आयोगाकडून प्रत्येक वर्षात मतदार यादी अद्यावत करण्यासाठी ‘मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम’ वेळोवेळी आयोजित करण्यात येत असतो. सद्यास्थीतीत देखील भारत निवडणूक आयोगाने ‘मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव असलेले पंरतू त्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत अशा मतदारांसाठी(Residuals Electors) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात मान्यताप्राप्त् राजकीय पक्षांची बैठक बोलाविण्यात येऊन त्यांना जालना तालुक्यातील (Residuals Electors) मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदारांची यादी तसेच नमुना 10 ची यादी, सि.डी. व्दारे देण्यात येऊन संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्याबरोबरच जास्तीत जास्त मतदारांचे फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात असल्याचे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जालना तालुक्यातंर्गत येणा-या तीनहीविधानसभा मतदार संघामध्ये सद्यस्थीतीत एकूण 343237 एवढे मतदार असून त्यापैकी 39740 मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये नाहीत. अशा मतदारांची (Residuals Electors) यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे देण्यात आली आहे. अशा मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदाराने त्यांचे स्वत:चे रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्र बीएलओ कडे जमा करावयाचे आहेत. अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव असलेले पंरतू त्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत अशा मतदारांनी अद्यापपर्यंत त्यांचे रंगीत छायाचित्र संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे जमा केलेले नाहीत त्यांचा स्थलांतर, दुबार, मयत पंचनामा करण्यात येऊन मुख्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत नाव वगळणीसाठीचा नमुना 7 चे अर्ज भरण्यात येऊन अशा मतदारांचा फॉर्म 10 मधील गोषवारा मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येऊन त्यांचे पंचनामे करण्याबरोबरच अशा मतदारांना सुनावणीसाठी नमुना नं.14 ची नोटीस देण्यात येऊन असे मतदार आढळून न आल्यास नोटीस तामील न झाल्याबाबतचा पंचनामा मतदान केंद्रावर प्रसिध्दी देऊन करण्यात येत आहेत.