धार्मिक

हजारो लग्नाळुंच्या आशा मंदावल्या : कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने लग्नात विघ्न

घनसावंगी न्यूज:

लग्नाळू तरुणावर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोकन्यासाठी अचानक लॉकडाउन व संचारबंदी लावल्याने लग्न जमलेल्या तरुणांच्या आशा मंदावल्या आहेत तर कोरोना विषाणूमुळे लग्न थांबले आहेत.

दरवर्षी तालुक्यात जवळपास हजारांहून अधिक जोडपे विवाहबद्ध होतात मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलून अगोदर संचारबंदी नंतर लॉकडाउन व जिल्हाबंदी चे आदेश दिल्यानंतर कडक पोलिस बंदोबस्त असल्याने घराबाहेर पडणे देखील जिकरीचे बनले आहे तर घराबाहेर पडतात पोलिसांकडून पोलिसांची खाकी दाखवली जात असल्याने सर्व धार्मिक कार्यक्रम,यात्रा,उत्सव,धार्मिक स्थळे,लग्नसमारंभ,तिर्थक्षेत्र बंद केल्यामुळे लग्नसमारंभासाठी केलेली तयारी वाया जाणार असून लग्नाळु तरुणांच्या आशा मंदावल्या आहेत तर वर आणि वधु पित्याचा लग्नाच्या तयारीसाठी केलेला खर्च वाया जानार या धास्तीने वर – वधु पित्याच्या पदरी मोठी निराशा पडली आहे.
यातच काही लग्नाळु तरुणांनी खबरदारी घेत देश सेवेसाठी एक पाऊल मागे घेऊन लग्न पुढे ढकलून गर्दी च्या भीतीने व प्रादुर्भावाच्या भीतीने मोठे पाऊल उचलले आहे.
समाजात होणाऱ्या स्रीभ्रूण हत्या व वंशाचा दिवा म्हणून मुलगी नको मुलगाच हवा हा अट्टाहासपायी मुलीचा तुटवडा झाल्याने अनेक लग्नाळु तरुणांचे लग्नाचे वय निघून जात आहे तर काही तरुण मिळेल त्या मुलीसोबत लग्नाचे स्वप्न रंगवत असतांनाच अनेक तरुणांचे लग्न जमले होते तर काहीच्या तिथी-तारखा देखील काढल्या होत्या मात्र अचानक जमावबंदी,संचारबंदी व लॉकडाउन झाल्यामुळे तरुणांच्या आशा मावळल्या असून लॉकडाउन संपन्याची वाट पाहण्या शिवाय काहीच पर्याय उरला नाही तर काही लोक अजूनही घरातच चार लोक जमवून गुपचूपपणे लग्न लावण्याच्या तयारीत आहेत.


वर – वधु पित्याच्या लग्नाची तयारी वाया जाणार
लग्नासाठी मुलाकडून व मुलीकडून भरपूर तयारी केली जाते त्यामध्ये मुलीकडच्यांना लग्न समारंभासाठी मंडप,डेकोरेशन,अन्नदान,मानपान,मुलीला संसार उपयोगी साहित्य,साड्या,दागिने,आहेर अशा अनेक गोष्टींची गजबज चालू असते व यासाठी अगोदरच नियोजन केलेले असते मात्र कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर केलेल्या संचारबंदी व लॉकडाउन मुळे मुलीकडचे व मुलाकडच्यांनी केलेल्या खर्च हा वाया जानार असल्याने वर – वधु पित्याच्या पदरी निराशा पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक