जालना जिल्हा

जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणुन
डॉ. विजय राठोड यांनी स्वीकारला पदभार

जालना दि. 14 :- जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची बदली महानगरपालिका, पुणे येथे झाल्याने त्यांच्या जागी जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणुन डॉ. विजय राठोड यांनी आज दि. 14 जुलै, रोजी पदभार स्वीकारला.
डॉ. विजय राठोड हे 2014 च्या बॅचचे सनदी अधिकारी असुन ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवासी आहेत. जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी डॉ. राठोड यांनी दर्यापुर जि. अमरावती येथे उप विभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, धारणी (मेळघाट) येथे उप विभागीय अधिकारी म्हणून तर गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम केले आहे. डॉ. विजय राठोड यांनी मीरा भाईंदर येथील महालिकेमध्ये आयुक्त म्हणुनसुद्धा यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे.
यावेळी मावळते जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डॉ. विजय राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!