कुंभार पिंपळगाव:शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर पाणी, ग्राम विकास युवा मंचचे ग्राम पंचायतला निवेदन
सरस्वती भुवन महाविद्यालय कडे जाणारा रस्त्याचे दुरुस्ती करण व नाली करण करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी यांना निवेदन सादर..
कुंभार पिंपळगाव / प्रतिनिधी
कुंभार पिंपळगाव येथील कुंभार खिडकी ते सरस्वती भुवन महाविद्यालय टि पाॅइंट कडे जाणारा रस्त्याचे तत्काळ दुरुस्ती करण व दोन्ही बाजूने नालीकरण करावे यासाठी ग्राम विकास युवा मंच व गावकरी यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले.या वेळी ग्राम विकास अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी अनिल शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारले.निवेदनात असे नमूद करण्यात आले की,गावातील कुंभार खिडकी ते सरस्वती भुवन महाविद्यालय टि पाॅइंट कडे जाणारा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.त्यातच परीसरातील दोन्ही बाजूंनी वसाहत असल्याने नागरीकांना नाल्यांची व्यवस्था नाही.
त्यांचे सांडपाणी जाण्यासाठी नालीकरणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे सांडपाणी हे रस्त्यावर येत आहे. सद्यस्थितीत पावसाळा असल्याने हा रस्ता चिखल मय झालेला आहे.या रस्त्याने पायी चालणे देखील अवघड झाले आहे.याच रस्त्यावर पिठाच्या गिरण्या असल्याने महिलांना पिठाच्या गिरणीत दळण घेवून जाताना आपला जीव मुठीत धरून बाजुच्या कडेने चालावे लागते कारण कोणत्याही परिस्थितीत चालत असताना रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने पाय घसरून पडेल याची शाश्वती नाही.यामुळे अनेकांना दुखापत होत आहेत.त्यातच हा गाव हद्द रस्ता असल्याने तो अंबड – पाथरी हायवे ला जोडल्या गेल्याने या रस्त्याने नेहमी वर्दळ होत आहे.त्यातच हा रस्ता शाळा महाविद्यालय कडे जात असल्याने या रस्त्यावरून पालक, विद्यार्थी यांना शाळा, महाविद्यालय व इतर कामांसाठी साठी जात असताना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते.तसेच लहान मुले शाळेत जाताना पाय घसरून पडत आहे.त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्ती करण करुन दोन्ही बाजूंनी नालीकरण करावे व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.
अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली.या वेळी सरपंच प्रतिनिधी अन्वर पठाण यांनी जेसीबी च्या साहाय्याने हा रस्ता मोकळा करून दिला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.या वेळी उमेश बोटे,अक्षय चांडक,प्रताप कंटुले, सुरेश कंटुले, संजय कंटुले,विष्णु आनंदे, दिनेश दाड, भागवत राऊत, महारुद्र गबाळे,पवन कंटुले, अनिल शिलवंत, वैभव कुलकर्णी,महाविर व्यवहारे,प्रकाश बिलोरे, बजरंग रत्नपारखे,दत्ताञय कंटुले, अविनाश कंटुले, हनुमान कंटुले, साहेबराव व्यवहारे,वैभव कंटुले, गणेश क्षीरसागर यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.