मराठावाडा

शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन पिकावरील खोडमाशी कीड नियंत्रण

            जालना, दि.15 ( न्यूज जालना) –  राज्यात सोयाबीन पिकाची मोठया प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला होता. या वर्षी सुध्दा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. खोडमाशीची प्रौढ अवस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान म्हणजेच 2 मी.मी. असते. या किडीची अंड्यातुन निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगांची असुन ही अंड्यातुन बाहेर पडलेल्या अळ्या प्रथम सोयाबीनची पाने पोखरतात आणि पानांच्या देठातुन झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन या फांदीचा किंवा खोडाच्या आतील भाग पोखरुन खातात. अशा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरुन पाहिल्यास आतमध्ये पांढुरक्या रंगाची अळी किंवा कोष आढळतो.

images (60)
images (60)

     या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्था झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर 10 ते 15 दिवसाचे पिक असताना झाल्यास, प्रादुर्भाव ग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणात होऊन कधी कधी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याची सुध्दा काम करु शकते व अशा प्रकारे रोपावस्थेत या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही. खोडमाशीने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याच्या वजनात घट होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. या पार्श्वभुमीवर सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास शेतकरी बंधुंनी खालील उपाय योजना करण्याबाबत कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

    जेथे या किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो. अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.सोयाबीन पिकास खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी प्रति हेक्टर 25 पिवळे चिकट सापळे लावावेत. खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जासत आर्द्रता, भरपुर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणुन अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या संदर्भात जागरुक राहुन वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत.पेरणीपुर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्त थामेथेक्झामची बीजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पिक 15दिवसाचे झलयानंतर इथियॉन 50 टक्के – 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के -6.7 मिली किंवा Chlorantraniliprole 18.5 टक्के -3.0 मिती प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!