बदनापूर तालुका

बदनापूर सभापती ने शेतातला अकरा क्विंटल गहू गरजूंसाठी ठेवला राखीवसभापती संतोष पवार यांचे दातृत्व, किराणा साहित्याचेही वाटप

बदनापूरन्यूज : कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि मजुरांना मदत करण्यासाठी अनेकजण सध्या पुढे येत आहेत. नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती संतोष पवार यांनी सामाजिक जाणिव ठेवत आपल्या शेतातील काढलेला अकरा क्विंटल गहू गरजूंना वाटप करण्यासाठी राखीव ठेवला. सध्या घरच्या गव्हासोबत विकतचा तांदूळ आणि किराणा सामानाचे किटचे देखील त्यांनी वाटप सुरू केले आहे.

सध्या सर्व कामे बंद असल्यामुळे रोजमजुरी करणाऱ्यांवर थेट उपासमारीची वेळ आल्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे. येथील संतोष पवार यांना गावातील अनेक कुटुंबांना खरोखर अन्नधान्याची गरज असल्याचे लक्षात आले. ही बाब त्यांचा मनाला व्यथीत करून गेली. त्यानंतर संतोष यांनी शेतातील काढलेला अकरा क्विंटल गहू गरजूंना वाटप करण्यासाठी राखीव ठेवला. नंतर विकतचे तांदूळ, किराणा साहित्य आणले. त्यांनी प्रत्येकी ५ किलो गहू, २ किलो तांदूळ, १ किलो खाण्याचे गोडे तेल, ५ बिस्कीट पुडे, १ किलो मीठ, १ किलो साखर, चहा पुडा, १ डेटॉल साबण या एकंदर सामानाची किट बनविण्यास सुरवात केली. स्वतः कीटची बांधणी सुरू केली, या कीटचे वाटप गरजू कुटुंबाना स्वयंसेवकांच्या हस्ते केले. विशेष म्हणजे त्यांनी मदत देत असताना कुणीही फोटो काढू नये, अशी सूचना देखील केली आहे. त्यांनी मदतीच्या कीटवर कोणतेही नाव न टाकता हे वाटप केलेले आहे. या अन्नधान्यात शहरातील कित्येक कुटुंबांचे काही दिवस जरी भागणार असले तरी लॉकडाऊन वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संतोष पवार हे या कुटुंबांच्या संपर्कातच राहणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत त्यांना पुन्हा मदत मिळवून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गरजुना मदत करावी असे आवाहन संतोष पवार यांनी केले आहे.

संतोष पवार- बदनापूर

देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे महत्वाचे झाले आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची तारांबळ उडू नये म्हणून अनेक लोक मदत करत आहेत. मी व माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून केलेली जाणारी मदत हे आमचे कर्तव्य मानतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक