घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव येथे रस्त्यावरच्या पार्किंगमुळे वाहतुकीची वारंवार कोंडी

कुंभार पिंपळगाव येथील रस्त्यावर अशा प्रकारे अत्यावस्तेत वाहने उभी केली जात आहे.

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे रस्त्यावरच्या पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत असून ही एक डोकेदुखीची मोठी समस्या होऊन बसली आहे.याकडे पोलिसांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
बुधवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी तर रस्त्यावर आडवी-तिडवी वाहनांची पार्किंग केल्यामुळे प्रचंड वाहतूकीची कोंडी होत असून एखाद्या आजारी माणसांना दवाखान्यात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.कुंभार पिंपळगाव हे तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे केंद्र असल्याने तसेच याठिकाणी राष्ट्रीयकृत, सहकारी, विविध कार्यकारी सोसायटी तसेच सहकारी पतसंस्था असल्याने आजूबाजूच्या ३० ते ३५ गावातील शेकडो नागरिकांची आर्थिक देवाण-घेवाणीसाठी दररोज ये-जा असते.याठिकाणी पार्किंगची वेगळी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थ रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असून या अस्ताव्यस्त पार्किंग मुळे वाहतूकीस मोठी अडचण निर्माण होत आहे.कुंभार पिंपळगाव येथे घनसावंगी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकीतील पोलीसांनी नेहमी नाही परंतु बुधवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तर वाहतूकीचा प्रश्न काहीअंशी सुटू शकतो.कुंभार पिंपळगाव येथील पोलिस चौकीत नव्याने रूजू झालेले सपोनि सोमनाथ नरके यांनी येथील वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!