घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा !

कुलदीप पवार /कुंभार पिंपळगाव

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बसस्थानकात दररोज शेकडो बस येत असतात.मात्र बसस्थानकात बसच्या तुलनेत खासगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत असल्याने एसटी बसस्थानक अनधिकृत पार्किंग झोनच बनले आहे.त्यांच्यावर बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.


एसटी बसस्थानकात फक्त एसटी बस येणे अपेक्षित असले तरी, कोणीही चालक आपले खासगी वाहने घेवून येतात.स्थानकामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने कितीही वेळ लावलेल्या दिसतात.अगदी ‘नो पार्किंग’ लिहिलेल्या फलकासमोरही खासगी वाहने लावलेली दिसतात.परंतु या वाहनधारकांना कोणीही अटकाव करीत नसल्याने दिवसेंदिवस या वाहनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.काही वेळा तर ज्या ठिकाणी ठराविक गावी जाणारी बस उभी राहते त्याच ठिकाणी अनधिकृत वाहने उभे राहत असल्याने एसटी चालकास बस लावण्यास अडचण होत असून प्रवाशांनाही आपली बस कुठे लागली याची कल्पना येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते.कुठूनही कशाही प्रकारे येणाऱ्या या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून याबाबत प्रवाशीसुद्धा त्रस्त झाले आहेत.तरीही या स्थानकातून ये-जा करणारी तसेच अनधिकृतपणे लावलेली व चालकांविरुद्ध बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक किंवा पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नवीन पोलीस अधिकाऱ्याने कारवाईची मागणी

कुंभार पिंपळगाव पोलीस चौकिला नव्यानेच सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके हे रुजू झाले आहे त्यांनी बस स्थानक भागात लागणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!