जालना जिल्हा

डाक विभागात विमा एजंटची थेट मुलाखतीद्वारे भरती

बेरोजगारांना सुवर्ण संधी

images (60)
images (60)

डाक विभागात विमा एजंटची

थेट मुलाखतीद्वारे भरती

      जालनादि.28 :– औरंगाबाद डाक विभागात जीवन विमा, ग्रामीण विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नेमणे आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे, शैक्षणिक पात्रता – अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र, राज्य सरकार मान्यता प्राप्त समकक्ष  परीक्षा उत्तीर्ण असावा. श्रेणी- सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वयंरोजगार वा यापैकी पात्रता असलेले इच्छुक. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक. निवड झालेल्या उमेदवारास रुपये 5000 हजार ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणुन ठेवणे बंधनकारक जि की राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र सरुपात असेल. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडुन तात्पुरत्या सरुपात परवाना देण्यात येईल, जो IRDA  ची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर  कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल.

       सर्व इच्छुकांनी प्रवर अधिक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग जुना बाजार, औरंगाबाद -431001 यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र तसेच खालील नमुन्यातील अर्जासह  दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्त्वावर असेल. असे प्रवर अधिक्षक डाकघर औरंगाबाद विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अर्जाचा नमुना खालील प्रमाणे

       विमा एजंटची नेमणुक करण्यासाठी अर्ज. संपुर्ण नाव, जन्म दिनांक, राष्ट्रीयत्व, वडिलांचे, पतीचे नाव, सध्या रहात असलेला पत्ता, मुळ पत्ता, शैक्षणिक पात्रता, विमा क्षेत्रातील इतर अनुभव असल्यास, मोबाईल क्रमांक, दिनांक व उमेदवाराची स्वाक्षरी असा राहील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!