सिनेअभिनेते ‘सैराट’ फेम संभाजी तांगडे यांची नियुक्ती.
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील भूमिपुत्र गेल्या 25 वर्षांपासून नाट्यक्षेत्रात काम करणारे, आपल्या अभिनयातून खेडेगापासून ते शहरापर्यंत सर्वांच्या मनात अधिराज्य करणारे एक लोक प्रतिभावंत सिनेअभिनेता संभाजी तांगडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र गुरुवारी (दि.29)गुरूवार रोजी देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, वक्तासेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप साळुंके , पंचायत समिती सदस्य सुशील तांगडे, आदींसह अनेकांनी उपस्थिती होती.
त्यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.