जालना जिल्हाभोकरदन तालुका

पदमावती येथिल शिक्षकाचे कोरोनाबाबत जनजागृती

धावडा ( न्यूज प्रतिनिधी )/जाबेर हुसेन पठाण

पद्मावती येथील शिक्षकाचे कोरोनाबाबत जनजागृती चे ऑडिओ व विडिओ लॉकडाऊन च्या काळात घरी बसूनच बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे याची दखल जिल्ह्यातील अनेकांनी घेतली असून या संदेशातून त्यांनी गायनाच्या माध्यातून जनतेला व नागरिकांनी तोंडाला मास किंवा रूमाल लावावा ,हात डेटाल तथा साबनाने स्वच्छ धुवावे सुरक्षित अंतर ठेवावे ,तोंडाला व चेहरेला वेळो वेळी हात लावू नये आदी विषयी जनजागृती करत आहेत

भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे मोठे सावट उभे राहिले असून आरोग्य व पोलिस कर्मचारी अहोरात्र राबत आहेत.देश लाॅकडाऊन असल्याने घरात बसूनच कोरोना जनजागृतीपर विविध स्वरचित गीतांचा व पेटी व तबला च्या अधारे व्हिडिओ तयार करून व्हॉट्सॲप, फेसबुक, खाजगी टि.व्ही चॅनल्स तसेच यूट्यूब अशा विविध माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य प्राथमिक शिक्षक दिलीप पुंडलिकराव शेवाळे . मु .पो . पदमावती ता .भोकरदन हे करीत आहे. भोकरदनतालुक्यातील वालसावंगी प्रथामिक शाळा येथे कार्यरत आहेत. ते एक उत्कृष्ट गायन कबमास्टरदेखील आहेत. घरी मुलांचे मनोरंजन करताना घरगुती उपलब्ध साहित्याचा वापर करून व्हिडिओचित्रीकरणासाठी त्यांच्या पत्नी यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.हि प्रेरणा त्यांचे मित्र सुनिल चव्हाण यांच्या संकल्पनेतून हि जनजागृती पर पेटी व तबला गायन च्या माध्यामातून जनतेच्या घराघरात हा संदेश पोहचवा अशी संकल्पना सांगितली व तीच मी आत्मसाथ करून जनतेपर्यंत पोहचण्या च्या प्रयत्न करित आहे . असून या
संपूर्ण कुटुंबाच्या कार्याचे सर्वत्र विविध माध्यमांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक