घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव सह परीसरातील अवैधरीत्या सुरू असलेले धंदे बंद करून कारवाई करण्याची बसपाची मागणी
कुंभार पिंपळगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांना निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे मोठे बाजारपेठेचे गाव असून या गावात व परीसरात दिवसेंदिवस अवैध धंद्यात वाढ होताना दिसत आहे. अशा अवैधरीत्या धंदा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने येथील सपोनि सोमनाथ नरके यांच्याकडे आज दि.3 मंगळवार रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार पिंपळगाव व परिसरात दारू, मटका, जुगार,गुटखा,अवैध वाळू वाहतूक,आदी व्यवसाय जोमाने व खुलेआम सुरू असून पानटपरी,हाटेल यामध्ये सर्रासपणे दारूविक्री सुरु आहे.अशा अवैध धंदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.