कुंभार पिंपळगावात चोरट्यांचा धुमाकूळ;पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव येथे दि.5 गुरूवार रोजी चोरट्यांनी रात्रभर धुमाकूळ घातला.परंतु रात्रीची गस्त घालणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. मात्र या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांना पुर्ण रात्र जागुन काढावी लागली. येथील आझाद नगर, नूतन वसाहत, शाहू नगर भागात काही चोरटे घुसल्याचे लोकांना दिसले.त्यांनी पोलीस कर्मचारी विष्णू कुंटे यांना याबाबत माहिती दिली. श्री.कुंटे यांनी एकट्याने वाहन घेऊन सायरन वाजवत पुर्ण परिसर पिंजुन काढला. पोलीस वाहन परत फिरताच पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा शाहूनगर भागात वळविला व एका घराचे गेटचे कुलूप तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला तेव्हा शेजारच्या शिक्षकांनी हे पाहून घरमालक धोत्रे यांनी फोन केला आणि माहिती दिली.मग धोत्रे यांनी मनोज गाढे यांना फोन करून माहिती दिली. श्री.गाढे यांनी पोलिसांना फोन करून चोरटे असल्याचे सांगितले. तेव्हा रस्त्यावर रात्रीची गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी श्री.कुंटे यांनी तात्काळ प्रसांगवधान साधत सायरन वाजवत धोत्रे यांच्या घराकडे धाव घेतली. वाहनाचा आवाज व जागे झालेले लोक पाहून चोरटे फरार झाले. या सतर्कतेमुळे श्री.कुंटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.