जालना क्राईम

कुंभार पिंपळगाव येथील पेट्रोलपंपावरून अडीच लाख रूपये चोरणारा चोरटा गजाआड

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्रीकृपा पेट्रोल पंपावरून एका चोरट्यांने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कबिन मध्ये विना परवानगी प्रवेश करून अडीच लाख रुपये चोरून नेल्याची हि थरारक घटना दि.10 मंगळवार रोजी भर सकाळी साडे नऊ वाजता घडली आहे. ह्याप्रकरणी बुधवारी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या आरोपींस पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पाथरी रस्त्यावर श्रीकृपा नावाचा पेट्रोल पंप आहे.कर्मचाऱ्यांच्या नजरचुकीने एका चोरट्याने कबिनमध्ये घूसून अडीच लाखाची रोकड लूटून पसार झाले.सदरील घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत संदर्भित चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली असून ह्यासदर्भात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे

याबाबत आरोपीने पैसे चोरून नेल्याची कबूली दिली आहे. संदर्भित रक्कम अद्यापही हस्तगत करण्यात आलेली नसून याबाबत एक पथक दुसऱ्या तालुक्यात रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांनी दिली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!