भोकरदन तालुका
संताच्या ग्रंथामध्ये अलौकीक शक्ती. हभप संतोष महाराज पवार

मधुकर सहाने : भोकरदन
भरकटलेल्या मनाला विश्वशांतीचा दिलासा मिळतो तो ग्रंथातुनच.ग्रंथ वाचल्याने बुद्धीच्या विकासात भर पडते. मणुष्यास सदगती प्राप्त होते व त्यातच आपले कल्याण आहे असे प्रतिपादन हभप संतोष महाराज पवार यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथे अखंड हरिनाम सप्ताच्या पहिल्या दिवसाच्या किर्तनात संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर निरुपण केले.
किर्तनात स्वरगंध संगीत क्लासेसचे संचालक शंकर महाराज साबळे,गव्हाड गुरूजी,संदिप महाराज,बालाजी महाराज यांचीही उपस्थिती होती.