कुंभार पिंपळगाव: बदलत्या वातावरणामुळे खासगी दवाखाने हाउस ‘फुल्ल’
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव सह परीसरात ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, त्यानंतर पावसाची दांडी,कडक उन्हामुळे वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजाराने रूग्णांची रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहेत.
पाऊस,ऊन, गारवा जाणवत असल्यामुळे हवामानातील या बदलाचा मानवी आरोग्यावर चांगलाच दुष्परिणाम होत आहे.थंडीताप,सर्दी, खोकला,यांसह अनेक साथीच्या आजाराने बळावल्याने खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहे.या बदलत्या वातावरणामुळे अंग दुखणे,अस्वस्थ वाटणे,उलट्या,मळमळ,डोके दुखणे,पेशी कमी जास्त होणे असे आजार जडत आहेत.त्यात बहूतांश ग्रामपंचायतीकडून धूरफवारणी,स्वच्छता होत नसल्याने नागरीकांना विविध आजारांशी सामना करावा लागत आहे.
“प्रत्येकांनी घरात स्वच्छता पाळावी,गरम पाणी उकळून प्यावे,शिळे अन्न पदार्थ खावू नयेत”.
डॉ.देविदास मेहेत्रे
आनंद क्लिनिक
कुंभार पिंपळगाव