पत्रकार संदिप पवार यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करा
कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांना निवेदन देताना
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
बदनापूर येथील दैनिक लोकप्रश्न वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी संदीप पवार यांना मारहाण करून जीव मारण्याची धमकी देणाऱ्या नायब तहसीलदार यांची चौकशी करून त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज दि.15 रविवार रोजी पोलीस उपनिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बदनापूर येथील दैनिक लोकप्रश्न वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी संदिप पवार यांनी वाळूमाफिया विरोधात बातमी प्रकाशित केली होती.सदरील बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकारांना अमानुष मारहाण करून जीव मारण्याची धमकी देणाऱ्या नायब तहसिलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, विष्णू आर्दड, रामेश्वर लोया, राजकुमार वायदळ, गणेश ओझा, अभिषेक दुकानदार,भागवत बोटे, बाळासाहेब व्यवहारे, सोहेल शेख, विठ्ठल काळे, सुदर्शन राऊत, कौतिक घुमरे, नवनाथ मोगरे,नितीन तौर, संभाजी कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.