शिवणगाव बंधाऱ्याची पातळी ९० टक्क्यांवर : ग्रामस्थांतुन समाधान१००० क्युसेस ने विसर्ग सुरू,८ क्रमांकाचा दरवाजा उघडला!
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर.
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्याची पातळी गुरूवारी (ता.१९) सायंकाळी ५ च्या दरम्यान नव्वद टक्क्यांवर पोहोचली होती या अनुषंगाने ८ क्रमांकाचा दरवाजा उघडून १००० हजार क्युसेस ने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
दरम्यान चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वरील बंधाऱ्यातुन सततचा विसर्ग चालु असून मंगरूळ येथील बंधाऱ्यातुन पाण्याची आवक गोदावरी नदिपात्रात चालु आहे यावेळी मंगरूळ बंधाऱ्याचा दरवाजा उघडला आहे तर शिवणगाव बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला असून एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग चालु असल्याची माहीती कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान पाणी पातळी नव्वद टक्यांवर ठेवण्यात आली आहे तर पाण्याची आवक पाहुण आणखी दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती बंधाऱ्यावरील कर्मचारी गौतम तौर यांनी दिली.
यामुळे बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांचा यावर्षी चा पाणी प्रश्न सुटला आहे.