दानवेंच्या त्या वक्तव्याचा जिल्ह्यात कॉग्रेसकडून विविध ठिकाणी निदर्शने करून निषेध.
न्यूज जालना ब्युरो :- राहुल गांधी हे गावाला आणि देवाला सोडलेले सांड आहेत अशी टीका काल जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज जालन्यातील गांधींचमन चौकात रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. (Congress agitation by burning symbolic statue of Raosaheb Danve in Jalna)
नेमके काय बोलले दानवे पहा
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाच्या वतीने ठिक ठिकाणी खा. दानवे यांचा तिव्र निषेध होत असतांना आज शनिवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी काल शुक्रवारी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान बदनापुर येथे आयोजित सभेत कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जिल्ह्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांमधुन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आज शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरुध्द कॉग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलतांना आ. कैलास गोरंट्याल यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करुन कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या विषयी या पुढे तोंड उघडले तर जिल्ह्यातील कॉग्रेस कार्यकर्ते आक्रमक होवून चांगला धडा शिकवतील असा इशारा यावेळी श्री. गोरंट्याल यांनी दिला. खा. राहुल गांधी देशाचे नेते असून कॉग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावर जिवापार प्रेम करतात वेळ प्रसंगी त्यांच्यावर आपला जिवसुधा ओवाळुन देतील ही बाब दानवे यांनी लक्षात घ्यावी. असेही श्री. गोरंट्याल यांनी सांगितले. जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी दानवे यांचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करुन दानवे हे नेहमीच बेताल वक्तव्य करतात ही अंत्यत निंदनीय बाब असल्याचे त्यांनी आपल्या भाषनातून नमूद करत कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी हे देशाचे नेते आहे. त्यांची उंची बघता दानवे आणि खा. राहुल गांधी यांची तुलनाच होवू शकत नाही. यापुढे खा. दानवे यांनी इतरांविरुध्द बोलतांना भान ठेवून बोलावे नसता त्यांना जिल्ह्यामध्ये फिरु देणार नाही असा इशारा राख यांनी दिला. शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करुन त्यांनी जाहिरपणाने माफि मागावी नसता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना ठिक ठिकाणी घेराव घालतील असा इशारा शेख महेमूद यांनी यावेळी दिला. या जाहिर निषेध कार्यक्रमात दानवे यांच्याविरुध्द जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या यावेळी तिव्र भावना दानवे यांच्याविरुध्द असल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. कैलास गोरंट्याल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी युवा नेते अक्षय गोरंट्याल, जालना तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत जाधव, नगरसेवक रमेश गौरक्षक, जगदिश भरतीया, संजय भगत, सय्यद अजहर, शेख शकील, राजस्वामी, रहीम तांबोळी, चंद्रकांत रत्नपारखे, शेख शमशु, कृष्णा पडुळ, सय्यद निजाम, फकीरा वाघ, नारायण वाडेकर, समाधान शेजुळ, मेघा चौधरी, असलम कुरेशी, अब्दुल हमिद, अरुण घडलिंग, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर उघडे, विठ्ठल गिराम, शिवाजी गायकवाड, शत्रूघन आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉग्रेसचे बदनापुरात दानवेच्या बेताल व्यक्तव विरोधात घोषणाबाजी करत निषेध…!
बदनापूर येथे जन आशीर्वाद यात्रा मध्ये बोलताना दानवे यांची जीभ पुन्हा घसरली थेट राहुल गांधी यांना वळूची उपमा दिली.
या निषर्थ बदनापूर कॉग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला .
अशा बेताल वक्तव्य बद्दल संसदेत दानवे यांनी राहुल गांधी यांची जाहीर माफी मागावी असे तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.