अंबड ते कुंभारपिंपळगाव बससेवा पूर्ववत सुरू करा युवासेनेची मागणी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलाक प्रक्रियेत सूरू करण्यात आली आहे.मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे अंबड ते कुंभार पिंपळगाव बससेवा त्वरीत सुरू करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने अंबड आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालय सुरू झाले आहे.शाळेत जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थांना खासगी वाहनांना प्रवास करावा लागत आहे.तसेच पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने विद्यार्थ्यांना गावाकडून शाळेकडे जाण्याकरिता खूप परिश्रम घ्यावे लागत आहे. व तसेच काही विद्यार्थ्यांना शाळेकडे जाण्याकरिता बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडत आहे. बससेवा जर तातडीने सुरू करण्यात नाही आले तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.त्यामुळे आगारप्रमुख यांनी त्वरीत बससेवा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर युवासेना उपतालुकाप्रमुख रवि शिंदे,बाळासाहेब इंगळे,राहुल कनके, गाेपाल तांगडे,माउली उंबरे,नकुल काकडे शुभम काकडे,कैलासराव अटकळ,तपाेवन काळे,आकाश माेहीते यांच्या सह्या आहेत.