आष्टी ग्रामपंचायतला कुलूप लागल्याने दोन दिवसांपासून आष्टी ग्रामपंचायत बंद !.
राजेश्वर नायक/आष्टी प्रतिनिधी :- परतूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आष्टी ची ओळख असून हि ग्रामपंचायत वेळोवेळी अनेक कारणाने चर्चेत असते या वेळी येथील ग्रामपंचायत गेल्या दोन दिवसांपासून कुलूप लावल्याने बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या बाबत आष्टीचे ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न घेतल्याने या प्रकरणा बाबत अधिक माहिती मिळाली नाही आष्टी ग्रामपंचायत ला सदस्यांनी कुलूप लावल्याचे बोलले जात असून हे कुलूप नेमके कोणी व कोणत्या सदस्यांनी लावले व कोणत्या कारणामुळे लावण्यात आले या बाबत गावात चर्चाना उधाण आले
असून त्यात ग्रामविकास अधिकारी या प्रकरणावर बोलण्यास टाळत असून नेमके हे कुलूप प्रकरण काय आहे या बाबत माहिती मिळत नसल्याने गटविकास अधिकारी सुरडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशि देखील संपर्क न झाल्याने विस्तार अधिकारी श्री परदेशी यांच्याशी या बाबत संपर्क केला असता ते म्हणाले कि काल आष्टीच्या ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांनी सांगितले कि मासिक बैठकीत जीएसटी वरून ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्यात वाद झाल्याने काल ग्रामपंचायत सदस्यांनी कुलूप लावल्याचे समजले असून त्या बाबत काही निवेदन किंवा काही दिले नसल्याचे सांगितले दरम्यान वाद ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा त्रास मात्र जनसामान्यांना असा नाट्यमय प्रकार आष्टी ग्रामपंचायत मध्ये पाहण्यास मिळत असुन या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.