ऐनवेळी रक्तदान करून महिलेचे वाचवले प्राण : व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार
हारून शेख यांचे अभिमानास्पद कार्य

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील एका मुस्लिम बांधवाने भोकरदन येथिल एका मराठा समाजातील महिलेला ऐनवेळी रक्ताची एक पिशवी देऊन समाजात आदर्श निर्माण करुन माणुसकी जपली आहे.
सविस्तर वृत्त असे की,घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील हारून शेख असे मुस्लिम बांधव याचे नाव असून त्यांनी केलेल्या कामामुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे .
हरून यांचा मित्र आजारी असल्याने त्याला भेटण्यासाठी जालना येथील उढाण हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यावेळी रुग्णालयाच्या बाहेर भोकरदन येथील एक राजाराम पाटील नावाचा तरुण त्याच्या पत्नीला घेऊन उढाण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते मात्र त्याच्या पत्नीची तब्यत अत्यंत नाजुक असल्याने तिला बी पॉझिटिव्ह रक्ताची पिशवीची आवश्यकता होती मात्र त्याच रक्तगट असलेली पिशवी मिळत नसल्याने तो खुप परेशान दिसत होता यावेळी हारून शेख यांनी विचारपूस केली यावेळी सविस्तर अडचण सांगितली हे समजताच हारून शेख या मुस्लिम बांधवाने कुठलाही विचार न करता माझा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि आत्तापर्यंत 28 वेळा रक्तदान केले आहे मी तुम्हाला रक्तदान करण्यास तयार आहे त्यावेळी जालना येथिल श्री स्वामी समर्थ रक्तपेढीत जाऊन एक पिशवी रक्त दिले राजाराम पाटील हे बी पॉझिटिव्ह रक्ताची पिशवी मिळत नसल्याने खुप परेशान होते मात्र हारून शेख यांनी रक्तदान करून एक पिशवी दिल्याने राजाराम पाटील यांच्या पत्नीला एकप्रकारे जीवदान च मिळाले असल्याने राजाराम पाटील व त्यांची पत्नी सविता पाटील व पाटील कुटुंबाने मनापासून आभार असुन हारून शेख यांच्या या अभिमानास्पद कार्यामुळे कुंभार पिंपळगाव येथिल व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक विनोद भगत, शिवव्याख्याते धनंजय कंटूले व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटूले यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
