दिवाळी अंक २०२१

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्याना अमृत महोत्सव
नावाची दोन हजार पत्रे


जालना (प्रतिनिधी) ः भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आ. बबनराव लोणीकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शुकवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या परिसरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथून राज्याचे मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांना अमृत महोत्सव नावाची दोन हजार पत्रे पाठविण्यात आली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी दिली.

images (60)
images (60)


प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात प्रा. जोगस यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी 15 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात हीरक महोत्सव असल्याचे म्हंटले तसेच स्वातंञ दिन, स्विय सहाय्यकास विचारुन सांगितला त्यामुळे मुख्यमंत्री महोदयास सदरील  वर्ष अमृत महोत्सव असून स्वातंञ दिन 75 वा आहे, हे त्यांच्या लक्षात रहावे याकरिता भाजपा युवा मोर्चाने महाराष्ट्रातून 75 हजार तर जालना जिल्ह्यामधुन दोन हजार पत्रे पाठविले असल्याचे प्रा. जोगस यांनी म्हटले  आहे.


यावेळी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस, युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष संदीप हिवराळे, जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले, जिल्हा क्रीडा संयोजक सचिन जैस्वाल, तालुका उपाध्यक्ष करण निकाळजे, शहराध्यक्ष सचिन नारीयलवाले, क्रांती खांबायतकर, सरचिटणीस विनोद दळवी, चिटणीस संतोष रौत्रे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!