घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस:नद्या नाल्यांना आला पूर

शिवनगाव बंधाऱ्याचे ६ दरवाजे उघडले ,नदीपात्रात ६० हजार क्युसेस ने पाण्याचा विसर्ग
अजूनही आवक वाढण्याची शक्यता : शेतकऱ्यांची पिके पाण्यात

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर

घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव बंधाऱ्यात मंगळवारी (ता.३१) पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीवरील शिवनगाव बंधाऱ्याची पातळी अचानक वाढल्याने व वरील बंधाऱ्यातून पाण्याची आवक कायम असल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे तर नदीपात्रात ६ दरवाजातून ६० हजार क्युसेस ने पाण्याचा विसर्ग केला आहे.
तसेच अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडणे चालू असून त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे . यामुळे गोदावरी पात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे .यामुळे गोदावरी गंगेला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे . मात्र सध्या शिवनगाव येथील बंधाऱ्याच्या १८ पैकी ६ दरवाजे उघडण्यात आले असून सद्यस्थितीत रिदोरी येथील रुद्रेश्वर महादेवाच्या पिंडीला पाण्याचा वेढा पडला आहे . तसेच शिवनगाव ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावर ३ फुटापर्यंत पाणी वाहत असून पुढील काळात नदीला पाण्याची आवक कायम राहिल्यास गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता असून या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच या परिसरातील काही गावांमध्ये घरांची पडझड देखील भरपूर प्रमाणात झाली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!