कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे उसाचे अतोनात नुस्कान झाले असून अनेक ठिकाणी ऊस भुई सपाट झाला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी उसाचे पीक भुईसपाट झाले आहे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले असून कुंभार पिंपळगाव परिसर सह श्रीपत धामणगाव ,गुंज, मूर्ती, लिंबी शिवणगाव ,भादली,नागोबाची वाडी,नाथनगर,विरेगाव, लिंबोनी,जांब समर्थ,कोठाला,घाणेगाव,भेंडाळा, यादी ठिकाणी जोरदार पावसामुळे उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान प्रशासनाच्या वतीने नुसकान ग्रस्त उसाच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी सरपंच दत्ता शिंदे, सुरेश शिंदे,वैभव शिंदे वैजिनाथ शिंदे, शरद फाटकुरे, नामदेव शिंदे ,विकास उगले,गोविंद शिंदे,भारत राऊत, अरुण शिंदे पांडुरंग शिंदे गणेश शिंदे मतीन शेख ,पराजी चौधरी,महादेव शिंदे,संपत शिंदे,बंडू मुळे, उमेश शिंदे,रमेश राऊत,श्याम शिंदे,उद्धव शिंदे,दगडुबा नवघरे,बालाजी शिंदे,गणेश तौर, मधुकर येले बाबुराव येले,पिनू वाहुले,बनशीधर सारडा, बशीर शेख प्रल्हाद शिंदे यादी शेतकऱ्यांनी केली आहे