वाटूर ते जिंतूर महामार्ग नूतनीकरण आवश्यक शशिकांत देशपांडे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
मंठा/रमेश देशपांडे
वाटूर ते मंठा महामार्ग सध्या मृत्यूचे माहेरघर झाले आहे महामार्गाने जाताना रस्ता कुठे व खड्डे कुठे हे समजणे अवघड होत आहे
त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तसेच खराब रस्त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे महामार्ग क्रमांक 548 c/NH61, हा महामार्ग नवीन करण्यासाठी माननीय नितींजी गडकरी साहेब यांनी घोषणा करून संबंधित कार्यालयाला आदेश सुद्धा दिले होते
परंतु नवीन कामास नूतनीकरणाची मंजुरी मिळाली नाही कारण की हाच महामार्ग समृद्धी महामार्ग करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे समृद्धी महामार्ग ही योजना चांगली आहे परंतु केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची गरज आहे आधीच कोरोना महामारी मुळे प्रत्येक राज्यावर संकट आले आहे त्यामुळे केंद्र सरकारला सुद्धा आर्थिक मदत करताना प्रत्येक राज्याचा विचार करावा लागत आहे त्यामुळे समृद्धी महामार्ग योजना रद्द करून महामार्ग क्रमांक548C,NH,61 तात्काळ वाटूर ते जिंतूर पर्यंत रस्त्याचे काम सुरू करून त्याचे नूतनीकरण करावे व चांगला समृद्ध महामार्ग झाल्यास समृद्धी महामार्ग म्हणून घोषित करावे अशी शिफारस त्यांनी माननीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे,