घनसावंगी तालुका

बससेवेअभावी विद्यार्थ्यांसह , भाविकांचे हाल ; जांबसमर्थ येथे बससेवा सुरू करण्याची मागणी.

images (60)
images (60)

अंबड आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक चंद्रजित गिलचे यांना निवेदन देतांना उपसरपंच अरविंद पवार , लिंबीचे सरपंच सुशील तौर.

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे बंद असलेल्या अंबड आगाराच्या बंद असलेल्या बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दिं.03) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जांबसमर्थ हे गांव समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ असून येथे भाविकांची दर्शनासाठी वर्दळ असते त्यासाठी अंबड आगाराने गेल्या वीस वर्षांपूर्वी अंबड-जांबसमर्थ-औरंगाबाद ही बससेवा भाविकांच्या सेवेसाठी सुरू केली होती परंतू गेल्या अनेक दिवसांपासून बससेवा बंद झाली आहे, तसेच जांबसमर्थ व परिसरातील विद्यार्थ्यांना एकही मानव विकास मिशनची बससेवा उपलब्ध नाही , विद्यार्थ्यांना दीड किलोमीटर पायी चालत राज्य मार्ग 61(अंबड-पाथरी राज्य मार्ग) वर पायी चालत यावे लागते परंतु तेथेही शाळेच्या वेळेत बससेवा उपलब्ध नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे, म्हणून सदरील बससेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी सरपंच बाबासाहेब तांगडे, उपसरपंच अरविंद पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

अंबड-लिंबी -श्रीपत धामणगाव बससेवा सुरु पूर्ववत करा.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंतु गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली अंबड- लिंबी-श्रीपत धामणगाव-औरंगाबाद ही बससेवा सद्यस्थितीत कुंभार पिंपळगांव पर्यत येते परंतु श्रीपत धामणगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम लिंबी गावापर्यंत पूर्ण झालेले आहे तरी सदरील बससेवा लिंबी पर्यंत सुरू करावी अशी मागणी सरपंच सुशील तौर यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!