घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव परीसरातील लघू तलावातील जलसाठ्यात वाढ

कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परीसरातील जांबसमर्थ,घाणेगाव,भेंडाळा येथील लघू तलावात ९७.९८ टक्के पाणी साठा झाला आहे.भेंडाळा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने येथील तलावात आज दि.४, रोजी जलपुजन करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे घनसावंगी विधानसभा अध्यक्ष रघुनाथ ताठे, उपसरपंच गणेश काळे, विलास सुराशे, अमोल गिरी, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.