घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव परीसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह जांबसमर्थ,विरेगाव,मुर्ती,धामणगाव,लिंबी,राजुरकर कोठा,नाथनगर,राजाटाकळी,भेंडाळा आदी गावात आज दि.(६) सोमवार रोजी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बैलपोळा हा सण बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा सण दरवर्षी साजरा करतात.मागील वर्षी राज्यात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले होते.त्यामुळे हा सण साजरा करण्यात आला नाही.परंतु यावर्षी मात्र कोरानाचे थैमान काहीसा प्रमाणात कमी झाल्याने सर्व ग्रामस्थ एकत्रित येत उत्सुकतेने मिरवणुकीत सहभाग घेवून बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!