घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावसह परीसरात मुसळधार पाऊस

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह जांबसमर्थ,राजाटाकळी, भेंडाळा, नागोबाची वाडी,उक्कडगाव,अरगडेगव्हाण,धामणगाव,नाथनगर आदी गावात आज मंगळवार दुपारी मुसळधार पाउस बरसला आहे.दरम्यान कुंभार पिंपळगाव ते आष्टी राज्य रस्त्यावरील बनाच्या नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.हा रस्ता बंद करण्यात आला आहे.जांबसमर्थ येथील लघु साठवण तलाव शंभर टक्के भरल्याने नदी, नाले दुधडी भरून वाहत आहे.तसेच कुंभार पिंपळगाव येथील बसस्थानकाला तलावाचे स्वरूप आले होते.अनेक दुकानदारांच्या दुकानात व घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.तसेच मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.या भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे.जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज सकाळपासून आकाश दाटून आले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!