मुसळधार पावसात रूग्णवाहिका अडकली;ग्रामस्थांच्या मदतीने केली वाट मोकळी
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
कुंभार पिंपळगावसह परीसरात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आज मंगळवार दुपारी रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे रस्त्यावरील पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
नदी, नाल्या वाहू लागल्याने मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.दरम्यान अरगडेगव्हाण ते पिंपरखेड रस्त्यावर पुलावरून पाणी वाहू लागल्याने कुंभार पिंपळगाव येथून जाणारी रूग्णवाहिका रस्त्यावरील पुलावर अडकली होती. ग्रामस्थांच्या मदतीने रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.पिंपरखेडला जाण्यासाठी या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.पिंपरखेडला ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.सद्यस्थितीत या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.