घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ हिकमत उढाण यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट

कुंभारपिंपळगाव: शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिकमतराव उढाण यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली.समवेत उपनेते लक्ष्मण वडले, तालुकाप्रमुख उद्धव मरकड उपस्थित होते.

images (60)
images (60)

कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शिवसेनेचे नेते सहसंपर्कप्रमुख डॉ हिकमत उढाण यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दि.दि.(९) गुरूवार रोजी मुंबई येथे भेट घेतली.घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह शेतकऱ्यांच्या घरांची पडझड पशुधनाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि त्याचबरोबर घनसावंगी मतदार संघात अति पावसामुळे झालेले नुकसान आणि या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हा हवालदिल झाला असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे जालना जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . विशेष सर्वाधिक जास्त नुकसान घनसावंगी मतदारसंघात झाले आहे.घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी,अंतरवाली टेंभी, भाटेपूरी,कुंभार पिंपळगाव, पिंपरखेड,मच्छिंद्रनाथ चिंचोली, राणीउंचेगाव, रामनगर,नेर,सुखापुरी, वडिगोद्री, गोंदी,साष्ट पिंपळगाव,शहागड आदी मंडळात घनसावंगी मतदारसंघांमध्ये तूर,कापूस, सोयाबीन,मूग, बाजरी, संपूर्णतः पिके गेली असून फळबाग आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी भयभीत झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत जाहीर करून दिलासा देणार असल्याचे ग्वाही दिली.यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, तालुकाप्रमुख उद्धवराव मरकड उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!