घनसावंगी तालुक्यातील ऊस,अतिवृष्टी संदर्भात मा.आमदार विलासराव खरात यांनी घेतली ना.दानवे यांची भेट
जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील ऊस,अतिवृष्टी संदर्भात मा.आमदार विलासराव खरात यांनी आज दि.12 रविवार रोजी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. घनसावंगी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची खुप मोठी अडचण निर्माण झाली आहे.यावेळी एम डी कोलते व साखर कारखान्याचे अधिकारी यांच्यात ऊसाच्या संदर्भात ना.दानवे साहेब यांच्या बंगल्यावर बैठकीत चर्चा झाली. मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सुरुवातीपासून उसाच्या प्रश्नावर सहकार्य करून उसाच्या जास्तीत जास्त टोळ्या मिळाव्यात अशी विनंती ॲड.खरात साहेबांनी केली.
तसेच घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ना.दानवे यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दानवे पाटील यांना भेटुन मा.आ ॲड.विलासराव बापू खरात यांनी निवेदन दिले.
तसेच घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील जालना तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना मा.आ.विलासराव बापु खरात यांच्या भेटी….
पिकांची झालेली दैना,खरडून गेलेल्या जमिनी,घरांची पडझड, गुरांचे नुकसान हे सर्व पाहताना शेतकऱ्यांचे नेते ॲड. विलास बापू खरात यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या यावेळी बापूने आपण शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना धिर दिला. यावेळी ग्रामस्थ शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना ऐकून घेतल्या या कठीण काळात शेतकऱ्यांनी धीर सोडू नका आपण शासन दरबारी नक्कीच मागणी करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव खरात यांनी सांगितले व संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी हि शेतकऱ्यांनी खरात साहेबांकडे केली.
यावेळी उपस्थित मा.किसनबापु शिंदे,मा.नामदेवराव ढाकणे,सुरेशआबा कदम,अशोकराव पवार,मुकुंदराव मुंडे, पञकार रायमल,डाॅ.कदम रमेशराव जोशी,तुकाराम डोंगरे,अंबादास नागवे, मदनराव कदम,परिहार साहेब व इतर ग्रामस्थ शेतकरी मान्यवर यावेळी उपस्थित होते.