कुंभार पिंपळगावात घरोघरी गौरींचे पुजन
कुंभार पिंपळगाव:येथे गौरींचे थाटामाटात आगमन झाले. गौरींना नैवेद्य दाखविताना ओझा परीवार.
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
आपल्या देशावर गतवर्षीपासून ओढावलेल्या कोरोना महामारीतून सर्वांची सुटका कर,पुन्हा पुर्वीसारखे आनंदाचे दिवस येऊ दे,सर्वांचे कल्याण कर अशी हार्त विनवणी गौराईंना भाविकांनी केली आहे.
रविवारी सायंकाळी सोनपावलाने घरोघरी भक्तिपूर्ण वातावरणात गौराईंची स्थापना करण्यात आली.पहिल्याच दिवशी लाडू-करज्यांचा नैवद्य दाखविण्यात आला.मंत्रघोषात येथील गौरींचे घरोघरी मनोभावे पुजन केले.यावेळी देवीला 16 भाज्या,कोशिंबीर, चटण्या,खीर,पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
आज गौराईला निरोप :
गणरायाच्या आगमनानंतर पाहुण्या येणाऱ्या माहेरवाशीण गौराईचे रविवारी दुपारी कुंभार पिंपळगाव परीसरात थाटामाटात आगमन झाले.समृद्धीच्या पावलांनी सौख्य समृध्दी अखंड सौभाग्य प्राप्त कर अशी प्रार्थना महिलांनी गौराईकडे केली.आज गौरीला निरोप दिला जाणार आहे.