घनसावंगी तालुकाजालना जिल्हामराठावाडा

राजाटाकळी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुल उभा करावा -सुनील आर्दड

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव : राजाटाकळी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुलासंदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड व इतर.

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

रांजणी ते राजाटाकळी हा 3 कोटी 78 लक्ष रूपयांचा तीन पदरी सिमेंट काँक्रीटकरण राज्य रस्ता मंजूर झालेला आहे.दरम्यान या रस्त्यावर राजाटाकळी हे गाव येत असल्याने या गावातील गोदावरी नदीच्या पात्रात पुल उभारण्या संदर्भात सर्व निकषांनुषार चौकशी करून कार्यवाही करावी,असे माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
पुढे बोलतांना आर्दड यांनी सांगितले की, यासंदर्भात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी,खा.प्रितम मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे मुख्य अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांना या पुलाबाबत सविस्तरपणे माहिती दिलेली आहे.केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची तात्काळ दखल घेत त्यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे मुख्य अभियंता यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी सांगितले.
आशियाई विकास बँक सहाय्यित प्रकल्प महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत रांजणी ते राजाटाकळी दरम्यान राज्य रस्ता मंजूर झाला असून तो सिमेंट रस्ता होणार आहे.त्यासाठी 378 कोटी रूपये मंजूर झाले आहेत.असे असताना देखील हा पुल गोपत पिंपळगाव (ता.गेवराई) येथे प्रस्थापित करण्यात आले आहे.भविष्यात या पुलावरून दररोज पाच हजार वाहनांची ये-जा असणार आहे.त्यामुळे 30 वर्षांचा हिशोब धरल्यास मेंटेनन्स पेट्रोल डिझेलसाठी अंदाजे सहाशे कोटी रूपये खर्च होणार आहे.या उलट हाच पुल गोपत पिंपळगाव-श्रीपत अंतरवाला(ता.गेवराई) हद्दीतच राजाटाकळी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुल उभा झाल्यास सहाशे कोटींचे नुकसान टळून मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.तसेच सर्वांसाठी सरळ रस्ता आणि सोयीस्कर पुल होणार आहे.या पुलासाठी 35 कोटी रूपये खर्च होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.हा पुल गोपत पिंपळगाव येथे होण्यासाठी गेवराई चे आमदार लक्ष्मण पवार यांनी पाठपुरावा केला होता.आमदार पवार यांची आपण भेट घेतली असून राजाटाकळी येथे होणारा पुल कसा फायदेशीर राहील याची माहिती त्यांना विस्तृतपणे दिली असल्याचे यावेळी सांगितले.हा पुल राजाटाकळी येथे व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार बंडू जाधव हे पाठपुरावा करीत असून राजाटाकळी गोपत पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने ठराव देखील दिल्याचे आर्दड यांनी सांगितले.हा रस्ता विदर्भासह हिंगोली, बुलढाणा, लातूर,बीड, जिल्ह्यातील प्रवाशी व वाहनधारकांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचे सांगितले.यावेळी शाम उढाण, अंकुशराव बोबडे, अशोक जाधव, विष्णू जाधव,शिवाजी कंटुले, रमेश काळे, बाळासाहेब बहिर, गोविंद शिंदे, रामेश्वर सोळंके, विष्णूदास आर्दड, भुजंग कंटुले, गणेश कवचट, भागवत उढाण आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!