जालना जिल्हा

जालना जिल्हाधिकारी यांच्याकडुन देवमूर्ती येथील रेशीम उद्योग कामांची पाहणी


जालना दि. 15 (न्यूज जालना) :-
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड तसेच उपजिल्हाधिकारी(रो.ह.यो.) रविंद्र परळीकर यांनी बुधवार 15 सप्टेंबर 21 रोजी देवमुर्ती ता.जालना येथील आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे जालना यांच्या ॲटोमॅटीक रेशीम रिलींग युनिट ला भेट देवुन माहिती घेतली.हे रेशीम रिलींग युनिट हे महाराष्ट्रात राज्यात सर्व प्रथम सुरू केलेले युनिट असुन यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्माण झाला आहे.

images (60)
images (60)

तसेच जालना रेशीम कोष बाजारपेठेतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषांना चांगला दर यामुळे मिळत आहे.या युनिट मधुन निर्यातक्षम 4 ए ग्रेड चा दर्जेदार निर्याताम रेशीम धागा तयार होत आहे. ॲटोमॅटीक रेशीम रिलींग युनिट चे संचालक सुरजभैय्या टोपे यांनी जिल्हाधिकारी यांना संपुर्ण प्रक्रीयेची माहिती दिली.
त्यानंतर कचरेवाडी ता.जालना येथे जिल्हाधिकारी तसेचउपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थी शिवाजी जाधव यांच्या रेशीम किटक संगोपन कामाची पाहणी केली.प्रसंगी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरीष्ठ तांत्रिक सहाय्यक एन.टी.दखनी तसेच कचरेवाडी गावातील मनरेगा योजनेचे लाभार्थी राजेंद्र कचरे, हरीभाऊ ठोकळ, मदनराव जाधव, शंकर कचरे, आप्पासाहेब कचरे, ग्रामरोजगारसेक लहु जाधव, हे उपस्थित होते.
हरीभाऊ ठोकळ यांचे कडे दोन एकर तुती लागवड असुन प्रत्येक महिन्यात त्यांचे 90000 ते 96000 रूपये रेशीम कोष विक्री पासुन होतात. लाभार्थी शिवाजी जाधव यांनी मनरेगा योजने मधुन आम्हाला किटक संगोपन गृह उभारणी करीता अनुदान मिळाले तसेच प्रत्येक पीकाच्या वेळेस मजुरी मिळाली त्यामुळे रेशीम उद्योग उभारणी करीता मोठा आधार मिळाला अशी माहिती त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली. लाभार्थी राजेंद्र कचरे, यांनी आम्ही गेल्या 16 वर्षापासुन रेशीम उद्योग करीत असुन यामुळे आमचे उत्पादन वाढीस खुप फायदा झाला असे सांगितले.


कचरेवाडी येथेच विजय पाटील यांच्या सॉइल टु सिल्क या चाकी केंद्रास जिल्हाधिकारी यांनी भेट देवुन चाकी किटकांची पाहणी केली व चाकीमुळे रेशीम शेतकऱ्यांच्या उत्पादनात कशी वाढ झाली याची माहिती समजावुन घेतली.


एकदंरीत रेशीम कोषविक्री पासुन मिळणारे प्रति एकर वार्षिक 2 लाख रुपयांचे उत्पादन व मनरेगामधुन मिळणारा मोबदला यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादनामध्ये वाढ होऊन ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रीया जिल्हाधिकारी यांनी दिली.


रेशीम विकास कामांच्या पाहणीचे नियोजन रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी केले होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!