घनसावंगी तालुकाजालना क्राईम

घनसावंगीतील बँकेत गर्दीचा फायदा घेऊन दहा हजार लंपास, तीन संशयीत ताब्यात

घनसावंगी / प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँकेत गर्दीचा फायदा घेऊन शेतकऱ्याच्या खिशातून 10 हजार रुपये चोरणाऱ्या तीन संशयित आरोपिंना अवघ्या तीन तासांत पकडण्यात घनसावंगी पोलिसांना यश आले आहे . त्यामुळे घनसावंगी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे . यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 15 सप्टेंबर 2021 रोजी घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील शेतकरी विक्रम एकनाथ खाडे ( वय 50 वर्ष ) यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली की ते 15 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास ते त्यांची दोन मुले रामेश्वर खाडे व सोपान खाडे सोबत बँक ऑफ महाराष्ट्र घनसावंगी येथे त्यांच्या नावावर आलेले ठिबक सिंचनचे पैसे काढण्यासाठी आले होते . विक्रम खाडे यांनी त्यांच्या नावे असलेले 20 हजार रुपये बँकेचा विड्रॉल भरुन काढले . काढलेले पैशामध्ये सर्व 100 रुपयांच्या नोटा होत्या .

दहा दहा हजारांचे दोन बंडल त्यांनी त्यांच्या उजव्या खिशामध्ये ठेवले व थोड्या वेळाने त्यांनी खिशात हात घातला तेव्हा त्यांना त्यांच्या खिशात फक्त एकच दहा हजार रुपयांचे बंडल दिसले . तेव्हा त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता पैसे सापडले नाही . म्हणुन त्यांची खात्री झाली की कोणीतरी त्यांचे पैसे खिशातुन काढुन घेतले आहे . तेव्हा त्यांनी बँक मॅनेजर यांना झालेली हकीगत सांगीतली व बँकेच्या बाहेर आले . त्यांनी काढलेली रक्कम पैकी 10 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातून चोरुन नेली आहे . सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासात सदर गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींना पकडण्यात घनसावंगी पोलिसांना यश आले आहे .

या संशयित आरोपीचे नाव अविनाश रमेश चव्हाण ( वय 19 वर्ष ) रा . घनसावंगी जि.जालना 2 ) सुंदर उर्फ सुदाम बालु काळे ( वय 25 वर्ष ) रा.हातडी ता . घनसावंगी जि.जालना 3 ) राम घन्शीराम चव्हाण ( वय 20 वर्ष ) रा.जांबसमर्थ ता.घनसावंगी जि.जालना असल्याचे पोलिसांनी सांगितले . आणखी त्यांच्या साथीदारांचा शोध घेणे चालू आहे . सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे , पोलिस उपनिरीक्षक डोलारे , ठाणे अमलदार बाळासाहेब मंडलिक , विठ्ठल वैराळ , गंगाराम कदम यांनी केला .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!