घनसावंगी तालुका

घनसावंगी तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न

घनसावंगी:येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत बोलताना खासदार संजय जाधव,हिकमत उढाण लक्ष्मण वडले व इतर

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार


अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे तात्काळ करणे,शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई देण्यासह पिक विमा मिळावा यासाठी घनसावंगी तहसील कार्यालयात आज दि.(१८) शनिवार रोजी शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली.घनसावंगी तहसील कार्यालयात खासदार संजय जाधव,सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण, लक्ष्मणराव वडले,ए.जे.बोराडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही.कोरोनासह इतर अडचणीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे त्यांना नुकसानीची मदत आणि पिक विमा रक्कम तातडीने पाठपुरावा करण्याचा सुचना खा संजय जाधव यांनी दिल्या.यावेळी शेतकऱ्यांनी अनेक समस्या खासदार जाधव यांच्या समोर मांडल्या.जाधव यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व अधिकारी शेतकरी यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!