जालना जिल्हा
आज ,उद्या, परवा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पाऊसाची शक्यता
जालना दि. 7 (न्यूज जालना):- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यामध्ये दि. 7 ते 9ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह, विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे या इशा-याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरीकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क रहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे