जालना जिल्हा

जालन्यात बसपाची संवादयात्रा: सत्ताधार्‍यांच्या शोषकवृत्ती मुळेच मराठवाडा उपेक्षित-अ‍ॅड.संदीप ताजने



जालना/प्रतिनिधी
कोरोना काळात जालना शहरात आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळ कारभारामुळे अनेक सर्वसामान्यांचा कोरोनाने बळी घेतला. पंरतु, राष्ट्रीय आपत्तीची सबब पुढे करून सत्ताधार्‍यांनी त्यांचे हात झटकले. जालन्याने राज्याला आरोग्य मंत्री आणि केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री दिला. असे असतानाही जालनेकरांच्या नशिबी सरकारी अवहेलनाच आली, अशी खंत बहुजन समाज पार्टीच प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांनी बुधवारी व्यक्त केली. संवाद यात्रेनिमित्त जालना शहरात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सत्ताधार्‍यांच्या शोषक वृत्तीमुळे मराठवाडा पर्यायाने जालना सर्वसमावेश विकासाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत आहे. पंरतु, जोपर्यंत शोषित, पीडित, उपेक्षित विरोधी हे सरकार राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेतून बेदखल होणार नाही तोपर्यंत जालन्याचा विकास होणार नाही, असा दावा अ‍ॅड. ताजने यांनी केला.

images (60)
images (60)


कार्यक्रमात प्रदेश प्रभारी  प्रमोद रैना   यांच्यासह प्रदेश महासचिव पंडित  बोर्डे, जेष्ठ नेते मुंकुद दादा सोनवणे, प्रदेश सचिव निवृत्ती बनसोडे, प्रभात खिल्लारे, जिल्हा अध्यक्ष हरीश रत्नपारखे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे, कोषाध्यक्ष शेख रजाक भाई, सचिव ज्ञानेश्‍वर गरबडे, महासचिव बरसोने, बीव्हीएफ चे रणजित हिवाळे, रमेश उबाळे, सुधाकर बडगे, शेख हसमुद्दिन यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये नागरिक हलाखीचे जीवन जगण्यासाठी मजबुर आहेत. दोन वेळच्या भाकरीसाठी ते संघर्ष करीत आहेत. झोपडपट्ट्यांच्या   पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. जिल्ह्याने केंद्र, राज्यापर्यंत नेतृत्व पाठवले आहे. पंरतु, दृरदृष्टीअभावर या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाचा जालनाकरांना फायदा होत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था बरीच भीषण आहे. बेरोजगारी आ वासून उभी आहे. अशात हे दोन्ही मंत्री केवळ मंत्रीपदाचा टेंभा मिरवण्यात व्यस्थ आहेत का? असा संतप्त सवाल अ‍ॅड.ताजने यांनी उपस्थित केला.


मराठवाडा शोषित,उपेक्षितांच्या अत्याचारांमध्ये आघाडीवर आहे.अशात सामाजिक परिवर्तन घडूवन आणण्यासाठी बसपाच एकमेव पर्याय आहे. सर्वजनांच्या सुखासाठी, सर्वजन हितकारक बसपाची विचारधारा सर्वसामान्यांना नवसंजीवनी देणारी आहे.मान्यवर कांशीराम यांचे विचार  बहन मायावती ,युवा नेतृत्व आनंद आकाश यांच्या नेतृत्वात राज्यभरात पोहचवण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजित करण्यात आली आहे. शोषितांमधून शासनकर्ती जमात घडवण्यासाठी या यात्रेने एक सकारात्मक वातावरण तयार केले आहे. उपेक्षितांमध्ये विश्‍वास निर्माण झाला आहे.आणि याच विश्‍वासाच्या बळावर आगामी निवडणूक बसपा स्वबळावर लढवणार असल्याचे आवाहन यावेळी अ‍ॅड.संदीप ताजने यांनी केले.


सर्वसमावेशक विकास हेच बसपाचे ध्येय-रैना
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच इतर सर्व समाज बसपाच्या ’सर्वसमावेशक विकास’ या ध्येयाच्या लक्षपूर्तीकरिता एकवटले आहेत. ’सर्वजनय हिताय, सर्वजन सुखाय’च्या उद्दिष्ट पूर्तीसाठी पार्टीचा कार्यकर्ता तन-मन-धनाने झटत आहे, असे प्रदेश प्रभारी  प्रमोद रैना म्हणाले. महाराष्ट्रातील इतर मागसावर्गीयांचे राजकीय आरक्षणाचा मुद्दा असो, सरकारी नोकरीतील एससी,एसटींचे पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा असो, सर्वच मुद्दयावर बसपा आक्रमक भूमिका घेवून सरकारला ओबीसी, एससी, एसटी तसेच सर्वसमाज हितकारक निर्णय घेण्यास बाध्य करेल, असे आश्‍वासन देखील त्यांनी यानिमित्ताने दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!