घनसावंगी तालुका

घनसावंगीत राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक दिनांक 21 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची घनसावंगी विधानसभा मतदार संघातील भव्य रँली काढून आढावा बैठक पार पडली. या बैठकीत येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती सोबत स्वबळावर लढवण्याची घोषणा शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दोडतले यांनी केली. व कार्यकर्त्यांना आदेश दिले की,येणाऱ्या काळात घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळकिल्ला म्हणून ओळखले जाईल असे रासप चे मुख्य महासचिव व माजी मंत्री बालासाहेबजी दोडतले यांनी सांगितले.राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनियुक्त पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र बाळासाहेब दोतडले यांच्या हस्ते दिले आहे.महाराष्ट्रभर पक्षाचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे घनसावंगी तालुक्यात ही आपण चांगल्या प्रकारे जोमाने कामाला लागा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला स्वबळावर लढवायची आहे असे आदेश पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब यांनी दिले या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले मराठवाडा प्रभारी नितीन दादा धायगुडे राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा अंबड नगरपरीषद रासपचे सभापती अशोक भाऊ लांडे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर साहेब नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले अंकल जेष्ठ नेते इंजिनिअर बाबासाहेब भोजन वकिल आघाडी चे जिल्हाअध्यक्ष श्रीराम हुसे सचिन खरात,रासपा युवक तालुकाध्यक्ष घनसावंगी तथा मा.संरपच राजाटाकळी रामेश्वर काळे युवा नेते गजानन वायसे , सोपानराव डाईफोडे संदीप पवार ,गणेश मिसाळ, शहादेव इंगळे, राहुल डोईफोडे, शरद पन्हाळे इतरही खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!