घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

इ पिक पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी; प्रशासनाचे दुर्लक्ष

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

चालू खरीप हंगामासाठी शासनाने इ पिक पाहणी सक्तीचे केली आहे.यासाठी महसूल, कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.परंतु, कुंभार पिंपळगाव परीसरातील अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसल्याने बहूतेक शेतकरी यांपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मोबाईल नसल्याने शेतकरी इ पिक पाहणी नोंदणीसाठी युवकांची मनधरणी करीत आहेत.मोबाईल नेटवर्क सुरळित सुरु नसल्याने अडचण निर्माण होत आहे.तलाठी,कृषी सहाय्यक,प्रशासनाचे अधिकारी हे मात्र हात वर काढीत आहेत.३० सप्टेंबर ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.अधिकाऱ्यांकडून कसल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक शेतकरी वंचित राहणार आहे.पावसामुळे शेतात जाणे मुस्किल झाले आहे.शासनाने थेट नुकसानभरपाई अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!