मराठावाडामहाराष्ट्र न्यूज

‘अशा’ पद्धतीने सुरु होत आहेत राज्यातील शाळा: वर्षा गायकवाड

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद

न्यूज जालना ब्युरो मुंबई: कोरोनामुळे (corona) मागच्या बऱ्याच महिन्यापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा (school) आता सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत. येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होतील. शिक्षण विभागाने (school dept) मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेला प्रस्ताव मंजुर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे

images (60)
images (60)

या पद्धतीने होतील शाळा सुरुग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होणारमंत्रीमंडळ आणि टास्क फोर्स, शिक्षणतज्ज्ञांशी बोलून एसओपीसंदर्भात चर्चा झालीविद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी एसओपी जाहीरविद्यार्थ्यांकडे कसे लक्ष दिलं पाहिजे, याबाबत पालकांसाठी सूचना आहेत.शाळेतून आल्यावर अंघोळ, युनिफॉर्म धुणे, मास्कचा नियमित वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन याबाबत एसओपी असतील.शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी असणार नाहीयेशाळांमध्ये उपस्थितीची सक्ती नाहीउपस्थितीसाठी पालकांची संमती असणं गरजेचं आहेप्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी कसं जोडता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेतसध्या निवासी शाळांसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाहीयेशाळेत येताना यायची काळजी, शिक्षकांचं लसीकरण याबाबत पेडीयाट्रीक टास्कफोर्सशी चर्चा झाली आहे.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याबाबत प्राधान्य आहेविद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच शाळा सुरु होतील. आठ दिवस तयारीसाठी मिळावेत म्हणून आज आम्ही घोषणा करत आहोत. विद्यार्थ्यांना उलट्या,जुलाब,ताप, पोटदुखी असेल तर पालकांना,शिक्षक यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील..ज्या शाळा कोविड सेन्टर म्हणून वापरल्या त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे.

कोरोना काळात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाली याची तपासणी सुरू आहेशिक्षकांना टास्क फार्स ने दिलेल्या सुचनांबाबत ट्रेनिंग दिले जाईल

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!