जालना जिल्हा

महावितरणच्या पद भरतीत गोंधळ झाल्याची विद्यार्थ्यांची तक्रार

जालना,दि. 3 (प्रतिनिधी) महावितरण कंपनीच्या पदभरतीमध्ये गोंधळ झाल्याची तक्रार आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्र रज्य विद्युत वितरण कंपनीत विद्युत सहाय्यक म्हणून भरती व त्यानंतर तंत्रज्ञ म्हणून नियमीत पद भरती या प्रक्रियेत सावळा गोंधळ झाला आहे.

images (60)
images (60)

आरक्षण वर्गवारी योग्य केली नाही तसेच प्रकल्पग्रअस्त विद्यार्थी यांची स्वंतंत्र वर्गवारी न करता त्यात जातीनिहाय वर्गवारी करुन आयबीपीएस या कंपनीने आरक्षण वर्गवारीचा कोणताही निकष न लावता निकाल हा एकत्रित सादर केला आहे. त्या अनियमीतता व गाेंंधळ झाल्यामुळे पात्र आरक्षण वर्गवारीतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्यामुळे सदर निकाल रद्द करुन आयबीपीएम या कंपनीची चौकशी करुन संपूर्ण निवड प्रक्रियेची चौकशी करावी आणि संबंधित कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

मयत प्रयोग शाळा परिचारीकेची देय रक्कम वारसांना देण्याची मागणी


जालना,दि. 3 (प्रतिनिधी) खान समीना बानो या प्रयोग शाळा परिचारिका म्हणून जुना बाजार औरंगाबाद येथे कार्यरत होत्या. परंतू त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या नावावर देय असलेली वैद्यकीय परिपूर्तीची रक्कम त्यांच्या वारसांना तातडीने अदा करावी, अशी मागणी सय्यद आरीफोद्दीन खादरी  यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खान समीना बानो या प्रयोग शाळा परिचारिका म्हणून जुना बाजार औरंगाबाद येथे कार्यरत होत्या. परंतू त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या नावावर देय असलेली वैद्यकीय परिपूर्तीची रक्कम त्यांच्या वारसांना तातडीने अदा करावी, अशी मागणी सय्यद आरीफोद्दीन खादरी यांनी केली आहे.  आपण खान समीना बानो यांचे पती असून  त्यांचे वैद्यकीय परिपूर्ती बील गणणा करुन शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. औरंगाबाद यांचे जमा आहे. तसेच सिव्हील सर्जन यांनी परिपूर्ती मंजूरी आदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण कागदपत्र प्रस्ताव दाखल केला आहे. सदर प्रस्तावास अद्याप मंजूरी देण्यात आलेली नाही, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!