घनसावंगी तालुका

शेतकर्‍यांचा घनसावंगीत हलगी मोर्चा, तहसील कार्यालयाला घेराव

घनसावंगी (न्यूज जालना) : अतिवृष्टीने (Heavy Rain) सडलेला माल बैलगाडीमध्ये भरून हलगी वाजवत संत रामदास महाविद्यालयापासून तहसील कार्यालयावर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हलगी मोर्चा काढून शेतकर्‍यांच्या (Farmer) मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. घनसावंगी (Ghansawangi) तालुक्यात पावसामुळे मागील महिनाभरापासून पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

images (60)
images (60)

हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे गेला. शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला. शासन व प्रशासनांच्या वतीने पंचनाम्यांसह कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर घनसावंगी (Jalna) तालुक्यातील युवकांनी युवा शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून तहसील कार्यालयांवर हलगी मोर्चा काढण्याचे (Farmers March) ठरविले. त्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले. गावागावांत दवंडीद्वारे शेतकर्‍यांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले. दरम्यान मंगळवार (ता.पाच) संत रामदास महाविद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत हलगी वाजवत मोर्चा काढण्यात आला. यावेळी यावेळी ऊसाला हमीभाव मिळत नाही.

अतिवृष्टीमुळे 100 टक्के नुकसान झाले असताना पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी, फळपिकांच्या नुकसानीपोटी एक लाखांची मदत द्यावी, पुरात वाहून गेलेल्या जनावरांबद्दल त्यांच्या मालकांस मदत द्यावी, पावसामुळे जमीन खरडून विहिरीत गाळ गेला आहे, तो गाळ काढण्यासाठी निर्णय व्हावा, नाले, ओढे हे अरुंद झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरले हे पाहता शासन दरबारी नोंद असलेल्या ओढ्यांची नियमाप्रमाणे विस्तारीकरण करण्यात यावे, शैक्षणिक फीस, वीजबिल माफ करण्यात यावी, शेतकर्‍यांना विनाअट विमा मिळाला पाहिजे, वर्ष 2018 चा मंजूर खरीप विमा तातडीने देण्यात यावा, वाहून गेलेले रस्ते, पूल अगोदर तात्काळ दुरुस्त करावे, शेतकर्‍यांचे शेततळे फुटले आहे त्यांना जाचक अटी न लागता निधी द्यावा, अनेक दुकानात पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे त्यांचा मदत मिळावी, घरांची पडझड झाली आहे त्यांना मदत मिळावी यासह इतर मागण्याचा समावेश आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या स्थितीवर जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची बैठक असल्याने तहसीलदार नरेंद्र देशमुख हे उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी तालुक्यातील शेतकरी बैलगाडीसह ट्रॅक्टर व विविध वाहनांसह ग्रामीण भागात काम करणारे विविध पक्षांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाली होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!