ताजोद्दीन बाबांचा आपणास अनेक वर्षाच्या सहवासाचे मोठे भाग्य- भास्करराव पेरे

घनसावंगी प्रतिनिधी
जातीधर्माच्या भिंती तोडून समाज प्रबोधन करणारे ह.भ.प. ताजोद्दीन बाबा यांचे नंदुरबार जिल्ह्यात किर्तन सेवा सुरू असतांना नुकतेच निधन झाले . त्यांनी वारकरी संप्रदायाची शिकवण जनमानसात रुजवण्यासाठी सतत प्रयत्न केले . लोकांच्या जिवनातील निराशा , एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी लोकांना एकत्रित राहण्याची प्रेरणा दिली तसेच सामाजिक बदल स्विकारण्यासाठी तयार केले अशा थोर किर्तनकार असलेल्या ताजोद्दीन बाबांचा आपणास अनेक वर्षाच्या सहवासाचे मोठे भाग्य लाभल्याचे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी केले .
वैकुंठवासी ताजोद्दीन बाबा यांच्यावर घनसावंगी तालुक्यातील त्यांच्या मूळगावी बोंधलापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे हे आज ( ता . 5 ) मंगळवारी बोंधलापुरी येथे आले होते . यावेळी त्यांनी ताजोद्दीन बाबा यांच्या सहवासातील काही घटनांना उजाळा दिला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश लोहिया , रामभाऊ लांडे , केशव आरगडे महाराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .