घनसावंगी तालुका

जालना जिल्ह्यातील ह्या तालुक्यातील दिव्यांग निधी तीन वर्षांपासून प्रलंबित

images (60)
images (60)

घनसावंगी/प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील दिव्यांगाचा  पाच टक्के निधी वाटपासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला आदेशीत करावे, यासाठी आज दि११ सोमवार रोजी प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले की,दिव्यांगाना जीवनमान सुधारण्यासाठी शासननिर्णयानुसार दिव्यांगाना पाच टक्के निधी वाटप करण्यात येते.मागील तीन वर्षांपासून हा निधी प्रलंबीत आहे. त्यामुळे अनेक दिव्यांगावर कोरोना महामारीत उपासमारीची वेळ आलेली आहे.तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीना पत्र देऊन हा निधी तात्काळ वाटप करावे अन्यथा आठ दिवसानंतर पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे यांच्याकडे निधी वाटपासाठी वारंवार मागणी करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात शेवटी म्हणाले.निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अनिरूद्ध म्हस्के, विष्णू मिठे,परमेश्वर जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!