घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घनसावंगी बाजार समितीने कापसाची केली इतक्या भावाने खरेदीला सुरूवात
कापसाला प्रतिक्विंटल 6601 रुपये भाव
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी कृषी उत्तपन्न बाजार समिती कुंभार पिंपळगाव येथील मीनाक्षी फायबर्स खासगी कापूस खरेदीला आज दि.15 शुक्रवार रोजी सुरुवात करण्यात आली. यावेळी जिनिंग चे संचालक अजय अग्रवाल बाजार समितीचे संचालक अजिम खा पठाण, केंद्रप्रमुख राहुल गुजर, दत्ता कंटुले,चांद भाई पटेल, सुदाम मुळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रथम कापूस विक्रीचा बहूमान कोठाळा बु.येथील शेतकरी विश्वंभर साबळे यांना मिळाला.त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या कापसाला प्रतिक्विंटल 6601 रुपये भाव देऊन कापूस खरेदी करण्यात आला.