दिवाळी अंक २०२१

भोकरदन तालुक्यातील धामणगाव येथे विवाहितेची आत्महत्या

(रवींद्रकुमार लोखंडे /पारध )

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील पारडज येथुन जवळच असलेल्या धाड पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या धामणगांव येथील महिला सुमनबाई रमेश शिनकर (वय 45) ही महिला दिं 16 वार शनिवारी सकाळी 5 वाजेदम्यान घराबाहेर थोडे फिरते म्हणुन बाहेर गेली असता परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सूरू केली असता त्यांना अशी माहिती मिळाली की चिंचीवाल्या मळ्यातील शेतशिवारातील असलेल्या अनील सपकाळ यांच्या मालकीच्या गट नंबर 240 या शेतातील विहिरीजवळ गावातीलच शेतकरी अनिल सपकाळ हे शेतात मोटर चालु करण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीच्या वर काढुन ठेवलेली चप्पल व बॅटरी आढळल्याने लगेच संशय गेल्याने त्यांनी फोनद्वारे माहिती गावातील व्यक्तींना कळवले असता गावात ही माहिती वार्‍यांसारखी पसरल्याने नागरीकांनी गर्दी केली होती

येथील पोलिस पाटील सविता पवार यांना कळविण्यात आले सदर या घटनेची माहिती लगेच धाड पोलिस स्टेशनला कळविण्यात आली असता मृृृृत व्यक्तिचा पंचनामा करून धाड येथील सामान्य रूग्णालय येथे पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून धाड येथील ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ए.एस. आय.सुरेश मोरे पो.ना भास्कर लवंगे पो.काॅ राजु माळी. पो.ना युवराज माळी हे करित आहे. (सदर महिलेच्या पश्यात पती दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे) सोबत फोटोः घटनास्थळी विहिरीजवळ पंचनामा करताना पोलिस कर्मचारी

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!